लैंगिक प्रश्नोत्तर
इथं जाणीवपूर्वक प्रश्न कर्त्याची नांवे देत नाही.
ही प्रश्ने आम्हाला ई-मेल द्वारे तुम्ही विचारली होती..
प्रश्नःसंभोग कालावधी वाढवण्यासाठी मी एक्सट्राँ टाईम निरोध ,अथवा जेल अथवा स्प्रे मारत जाऊ का.
उत्तर - काहीजण संभोगाचा कालावधी वाढवण्यासाठी ऍनेस्थेटीक जेली अथवा स्प्रे लिंगाला लावून लिंग काही अंशी लिंग बधिर करून संभोग करतात. या रसायनामुळे संभोगाचा कालावधी वाढू शकतो. पण लिंगाची संवेदनशीलता कमी होते व संभोगातून कमी सुख मिळतं. अशा प्रकारचं रसायन निरोधाच्या वंगणात वापरून संभोगाचा कालावधी वाढवणारे निरोध बनवले जातात. या ‘एक्स्ट्रा टाईम’ निरोधाच्या वंगणात अशा तर्हेचं ऍनेस्थेटीक रसायन मिसळलेलं असतं.पुढे जाऊन यानं लिंगाची ताठरता कायमची जाऊ शकते अथवा जन्मभर ते वापरायला लागू शकते पण नंतर बधीरता आल्यावर त्या सुखात तुम्हाला काही अर्थ जाणवणार नाही.
@Marathisexinfo
प्रश्न - मी पस्तीस वर्षाचा तरुण असून माझे लिंग वाकडे झाले असल्यासारखे जाणवते यामुळे माझ्या भावी आयुष्यावर काही परिणाम तर होणार नाही ना?
उत्तर -
नैसर्गिकरित्या सर्वच पुरुषांच्या लिंगाला थोड्या फार प्रमाणात बाक असतो, लिंग थोडेसे वाकडे असते. फार थोड्या पुरुषाचं लिंग अगदी सरळ असतं. या बाकामुळे संबंधांच्या वेळी काही अडचण येत नाही. परंतु संभोग करताना जर का वेदना होत असतील तर डॉक्टरचा सल्ला घेणं योग्य ठरेल. क्वचित केसेस मध्ये लिंगाचा वाकडेपणा खूप जास्त वाढलेला दिसतो व त्यामुळे लिंगाला योनीत किंवा गुदद्वारात प्रवेश करताना अडचण येते. शस्त्रक्रिया करून किंवा मेडिकल उपकरणांचा वापर करून लिंगाचा बाक कमी करता येऊ शकतो.फार काही त्रास होत नसेल तर काळजी करू नका. जास्तच त्रास असेल यानं वैवाहिक जीवनात बाधा येत असेलतर मात्र सेक्साँलाँजिस्ट ना भेटा. तसेच तत्पूर्वी आपण रोज अश्वगंधारिष्टा तेलानं रोज माँलीश करत जा निश्चितच फरक दिसेल.
प्रश्न - माझ्या लिंगाचा आकार लहान असल्याने मला संभोग करता येईल का माझ्या मध्ये पुरुषी भावनाच आहे पण लिंगाचा आकार छोटा असल्याने मनात न्युनगंड आहे.
उत्तर -
प्रत्येकाच्या लिंगाचा आकार आणि लांबी वेगवेगळी असते. साधारणपणे लिंग शिथिल असताना ते ६ ते १३ सेंटीमीटर (३-४ इंच) लांब असतं तर ताठ झाल्यावर त्याची लांबी ७ ते १७ (४-५ इंच) सेंटीमीटर एवढी असू शकते. साधारणपणे लिंगाची लांबी १२ सेंटीमीटर असते तेवढी साईज आपल्या लिंगाची असल्यास घाबरण्यासारखे काही नाही.
Comments
Post a Comment