Sexual health Tips: सकाळी की रात्री? सुखी लैंगिक जीवनासाठी कोणती वेळ योग्य, तज्ज्ञ सांगतात.......
जर तुम्हाला असं वाटत असेल की पार्टनरला सेक्स लाईफमध्ये फारसा इंन्टरेस्ट राहिलेला नाही किंवा सेक्स लाईफ दिवसेंदिवस जास्तच बोअर होत चालली आहे. तर यामागे काही खास कारणं असू शकतात. तुम्हाला कल्पना नसेल पण तुम्ही ज्यावेळी शरीरसंबंध ठेवता त्या वेळेचा तुमच्या सेक्स लाईफवर परिणाम होत असतो. सुखी आणि आनंदी लैगिंक जीवनासाठी तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. याबात सेक्सोलॉजिस्ट अर्थात लैंगिक विकार तज्ज्ञ डॉक्टर राजन भोसले यांनी अधिक माहिती दिली आहे. शरीरसंबंध ठेवण्याची योग्य वेळ कोणती? डॉ. भोसले सांगतात, "ज्यावेळी दोघंही रिलॅक्स असतील, शरीरसंबंधांचा मूड असेल किंवा दोघांनाही एकमेंकाबद्दल आकर्षण वाटत असेल तर अशावेळी कपल्समध्ये वेळेचं बंधन आडवं येत नाही. त्यांना जेव्हा सोयीस्कर वाटेल तेव्हा ते शरीरसंबंध ठेवू शकतात. रात्री किंवा सकाळच्यावेळेतच शरीर संबंध ठेवायला हवेत असं काहीही नाही. ज्यावेळी दोघांमध्येही भावना जागृत झालेल्या असतील ती योग्य वेळ ठरू शकते. म्हणूनच संभोग असा शब्द वापरला जातो. सम आणि भोग म्हणजेच यात दोघांनाही सम प्रमाणात आनंद मिळतो." वैद्यकीयदृष्ट्या पहाटेची वेळ प्रभावी ...